breaking-news

सोलापूरच्या खासदारांना तात्पुरता दिलासा; जात पडताळणीच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती

सोलापूर | महाईन्यूज

लोकसभा निवडणूकीत बेडा जंगम जातीचा बनावट दाखला सादर केल्याचा, जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जात पाडताळणी समितीने पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर दि.८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

सोलापूर लोकसभा निवडणूक २0१९ मध्ये अनुसूचित चाती प्रवर्गातून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेड जंगम हा जातीचा दाखला सादर केला होता. हा जातीचा दाखला बोगस असल्याचा अक्षेप रिब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (पी.जी) चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी घेतला होता. समाज कल्याण विभागातील जात पडताळणी समितीने केलेल्या चौकशीत, बेडा जंगम हा जातीचा दाखला बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी जात पडताळणी समितीने अक्कलकोटचे प्रभारी तहसिलदारांना न्यायालयात फिर्याद देण्याच्या सुचना केल्या होत्या. प्रभारी तहसिलदारांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयात यावर सुनावली होऊन सदर बझार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button