breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीव्यापार

श्रीमंतांच्या यादीत भारतात मुकेश अंबानी ‘नंबर वन’, टॉप १० भारतींयांची लिस्ट पाहा

India Richest Person : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर असून त्यांची$८३ अब्ज वरून $११६ अब्ज झाली आहे, ज्यामुळे $१०० बिलियन क्लबमध्ये प्रवेश करणारे ते पहिला आशियाई बनले आहे. मुकेश अंबानी यांनी आपले स्थान श्रीमंतांच्या यादीत कायम राखले आहे. मुकेश अंबानी हे जगात नवव्या क्रमांकवर तर भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

फोर्ब्सच्या २०२४ च्या जागतिक अब्जाधीश २०२४ च्या यादीत २०० भारतीयांचा समावेश आहे. मागच्या वर्षी १६९ चा आकडा होता. या भारतीयांची एकूण संपत्ती ही $९५४ अब्ज आहे. मागच्या वर्षी $६७५ बिलियन वरून ४१ टक्के जास्त झाली आहे.

हेही वाचा – राज्यातील ‘या’ विभागात ‘या’ दिवशी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार

श्रीमंतांच्या यादीनुसार गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची यापूर्वी संपत्ती ही $३६.८ अब्ज इतकी होती. तर सध्या त्यात वाढ झाली आहे. एकूण संपत्ती ही $८४ अब्ज इतकी असून जगात ते १७ व्या स्थानावर आहे. स्त्रियांच्या यादीत भारतातील सगळ्यात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल आहे. भारतात त्या चौथ्या क्रमांकाच्या यादीत आहे. वर्षभरापूर्वी त्या सहाव्या क्रमांकावर होत्या.

श्रीमंतांच्या यादीत नरेश त्रेहान, रमेश कुन्हीकन्नन आणि रेणुका जगतियानी यांचाही समावेश आहे. तर बायजू रवींद्रन आणि रोहिका मिस्त्री यांचे नाव वगळण्यात आले आहे. पाहूयात टॉप १० भारतीयांची लिस्ट.

मुकेश अंबानी – $११६ अब्ज संपत्ती

गौतम अदानी – $८४ अब्ज संपत्ती

शिवा नाडर- $३६.९ अब्ज संपत्ती

सावित्री जिंदाल- $३३.५ अब्ज संपत्ती

दिलीप संघवी- $२६.७ अब्ज संपत्ती

सायरस पूनावाला- $२१.३ अब्ज संपत्ती

कुशल पाल सिंग- $२०.९ अब्ज संपत्ती

कुमार बिर्ला – $१९.७ अब्ज संपत्ती

राधाकिशन दमाणी- $१७.६ अब्ज संपत्ती

लक्ष्मी मित्तल- $१६.४ अब्ज संपत्ती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button