breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंचा संघात समावेश

Under 19 World Cup 2024 : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. BCCI ने अंडर-१९ वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी उदय सहारन याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे तर सौम्य कुमार पांडेवर उपकर्णधारपदाची धुरा दिली आहे. BCCI ने यावेळी १५ खेळाडूंशिवाय चार बॅकअप खेळाडूंनाही संघात संधी दिली आहे.

अंडर-१९ वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेकडे आहे. या स्पर्धेतील एकूण १६ संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ए ग्रुपमध्ये बांगलादेश आयर्लंड आणि अमेरिका आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ब्लोमफोटेंनमध्ये करण्यात आलं आहे.

हेही वाचा  –  Sporting spirit increases confidence among students!

अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शीन, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर, अवनीश राव, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला.

बॅकअप प्लेअर्स : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button