breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ जणांचा मृत्यू

Buldhana Accident : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. काल रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्दी महामार्गावरून ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला.

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE 1819 क्रमांकाची बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्दधी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर या बसने काही वेळातच पेट घेतला, यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली.

हेही वाचा – ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही’; पंकजा मुंडेंचा निर्धार

https://twitter.com/ANI/status/1674937168148705280

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाळांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत

झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button