breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सोन्या-चांदीच्या भावात तेजी

नवी दिल्ली – शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे आणि आजही बाजारात सुस्तीचे वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोने आणि चांदीकडे वळले आहेत. त्यामुळे १५ दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात ३६३ रुपयांनी, तर चांदीच्या दरात १,११० रुपयांनी वाढ झाली आहे.

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात सुरू असलेली घसरण सोमवारी थांबली. त्यामुळे सोन्याचा भाव ३६३ रुपयांच्या वाढीसह ५१,०४० रुपयांवर बंद झाला. चांदीच्या भावातही १,११० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचा एक किलोचा भाव ६८,३७६ रुपयांवर गेला. ऑगस्टमध्ये कमॉडिटी बाजारात सोने ५६,२०० रुपयांवर गेले होते. मात्र त्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली. त्यामुळे सोने महिनाभरात जवळपास ५,००० रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी १० हजारांनी घसरली होती. पण आता ही घसरण थांबली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button