breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोमाटणे टोल नाक्‍यावर वाहनचालकांना कोंडीमुळे मनस्ताप

पिंपरी |महाईन्यूज|

तळेगाव स्टेशन – मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणेतील तांत्रिक अडचणी आणि नियोजनाच्या अभावामुळे वाहनधारकांना टोल भरून मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. नित्याच्या कोंडीमुळे मावळसह बाहेरच्या वाहनधारकांना ताटकळत उभे राहावे लागते.

केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगसाठी एक जानेवारीला मुदतवाढ देत २६ जानेवारीची मुदत वाढवून दिली. यापूर्वी अनेक रंगीत तालमी झाल्या. मात्र, सोमाटणे टोलनाक्‍यावर अद्याप फास्टग यंत्रणेचा जम बसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी वाहनधारकांना बराच काळ ताटकळत थांबावे लागत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा रोज पाहायला मिळत आहेत. फास्टॅग कार्डमध्ये बॅलन्स असूनही यंत्रणेतील पैसे कट न झाल्यास तसेच इतर कारणांसाठी वाहनधारकांना तासनतास थांबवून ठेवले जाते.

एकीकडे फास्टॅग यंत्रणेतील अनेक त्रुटी तांत्रिक अडचणी असल्यामुळे वाहनचालकांना कार्डवर बॅलन्स असूनही बऱ्याचदा पैसे कट होत नाहीत, असा आरोप चालकांकडून होतो आहे. पैसे कट झाले तरी यंत्रणेत अपडेट न झाल्याने पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. दुसरीकडे फास्टॅग यंत्रणेत कुठल्याही तांत्रिक अडचणी अथवा त्रुटी नसल्याचे टोलनाका व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

सध्या ऊसतोडणीचा हंगाम असल्याने उसाच्या डबल ट्रॉली तसेच ट्रक संथ गतीने चालतात. लोकल बंद असल्याने प्रवासी चारचाकी वाहने जास्त वापरतात. लॉकडाउननंतर सूट मिळाल्यानेही लोक वाहने घेऊन घराबाहेर पडतात. सरकारने इशारा देऊनही केवळ पन्नास टक्के वाहनधारकांनीच फास्टॅग लावले आहेत. त्यामुळे साहजिकच कोंडी होणे क्रमप्राप्त आहे.
महादेव तुपारे, व्यवस्थापक, आयआरबी, सोमाटणे 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button