breaking-newsराष्ट्रियव्यापार
सोन्याच्या किंमतीत सलग 16 व्या दिवशीही वाढ;पहिल्यांदाच 57 हजारांच्या पार
नवी दिल्ली – सोन्याच्या किंमतीत सलग 16 व्या दिवशीही वाढ सुरूच राहिली आहे. काल दहा ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच 57 हजारांच्या पुढे गेली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ सुरु असतानाच चांदीचे भावही एक किलोसाठी 77 हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
काल सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 57, 008 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. त्याचवेळी मुंबईत सोन्याचा भाव वाढून प्रति दहा ग्रॅम 56, 254 रुपयांवर पोहोचला आहे. कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, अमेरिकेच्या कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक हा गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी पातळीवर पोहोचला आहे. तसेच चीन-अमेरिका यांच्यातील वाढता तणाव यामुळेही सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.