breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी कायद्याची आवश्यकता; IMA चे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

नवी दिल्ली |

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आरोग्याशी संबंधित हिंसाचाराविरोधात प्रभावी आणि कडक कारवाईस मान्यता देण्याची विनंती केली आहे. तसेच भारतात आरोग्य हिंसाचाराविरूद्ध सर्वसमावेशक, न्याय्य आणि प्रभावी कायद्याची आवश्यकता असल्याचे आयएमएने पत्रात म्हटले आहे. सोमवारी आसामच्या होजल जिल्ह्यात एका डॉक्टरांवर लोकांच्या एका टोळीने हल्ला केला, ज्यामध्ये एका करोना पेशंटचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात आयएमएने करोना आजाराच्या प्रभावी व्यवस्थापनाबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे की, इंडियन मेडिकल असोसिएशन करोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढ्यात देशाच्या पाठीशी उभी आहे. मात्र, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांविरूद्ध विनाकारण हिंसक घटना गेल्या काही वर्षापासून वाढल्या आहेत. हे वैद्यकीय जगासाठी धोकादायक बनले आहे.

आयएमएने म्हटले आहे की, संपूर्ण वैद्यकीय समाज देशासोबत उभा आहे. आम्ही करोना केवळ अथक परिश्रमचं नाही तर आरोग्याशी संबंधित हिंसाचाराचा गंभीर घटनांचा देखील सामना करत आहोत. सोमवारी आसाममध्ये डॉ. सेज कुमार यांच्यावर हल्ला झाला असल्याची माहिती आहे. ते होजल जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर येथे कार्यरत आहेत. हा अत्यंत अमानुष हल्ला होता. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना हिंसाचाराच्या तणावात काम करणे कठीण जात आहे. देशभर ही एक धोकादायक बाब बनली आहे. आरोग्यास हिंसाचाराविरूद्ध भारताला सर्वसमावेशक, न्याय्य आणि प्रभावी कायद्याची आवश्यकता आहे. आरोग्य सेवा हिंसाचाराविरोधात प्रभावी आणि कडक कारवाईस मान्यता द्यावी, अशी विनंती आयएमएने केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button