breaking-newsराष्ट्रिय

ओडिशा, आसाममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली – ओडिशाला आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. येथील बरहामपूरमध्ये सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल एवढी होती. ओडिशाबरोबरच आसाममध्येही भूकंप झाला. मात्र या दोन्ही भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

ओडिशातील बरहामपूर येथे आज सकाळी भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू या शहरापासून ७३ किलोमीटरवर होता. याबरोबरच आसाममध्येही भूकंप झाला. गेल्या काही दिवसांपासून या भागात सतत भूकंप होत आहेत. गेल्या सोमवारी पहाटे ५ वाजून २६ मिनिटांनी आसाममधील सोनितपूरमध्ये भूकंप झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button