breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पितात; त्यांना काही काम नसतं”- सत्यपाल मलिक

गोवा | महाईन्यूज

गोव्याचे विद्यमान राज्यपाल आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बागपतमध्ये भाषण करताना त्यांनी एकूणच राज्यपालांना काही काम नसते, तर काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पीत असतात, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.मलिक हे उत्तर प्रदेशमधील आपल्या मूळ गाव असलेल्या बागपतच्या दौर्‍यावर होते. या ठिकाणी बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी देशातील राज्यपालांच्या कामाविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले.

राज्यपालांना काहीच काम नसतं, तर काश्मीरचे राज्यपाल हे सतत दारू पीत असतात. तसेच इतर ठिकाणचे राज्यपाल आरामात राहतात, कोणत्याही भांडणात पडत नाहीत असंही मलिक म्हणालेत.

विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये जेव्हा कलम 370 हटवण्यात आली, त्यावेळी तिथे मलिक हे तत्कालीन राज्यपाल म्हणून नियुक्त होते. तर त्यांनी बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम पाहिले असून, ते सद्या गोव्याचे विद्यमान राज्यपाल आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद सोशल मिडियावर सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button