breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनच्या कोव्हिशील्ड लस संशोधनातील ‘भीष्माचार्य’ डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

पुणे – सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. डॉक्टर जाधव हे ७२ वर्षांचे होते. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड वॅक्सीन तयार करण्यात डॉक्टर जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काल पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. डॉक्टर जाधव यांच्या जाण्यानं भारतीय वैद्यकिय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. सुरेश जाधव यांनी कोरोना लसीच्या संशोधनात मोलाचे योगदान दिले. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्ड तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. डॉ. सुरेश जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये ‘पीएच. डी.’ घेऊन १९७० पासून पन्नास वर्षांची अखंड सेवा दिली. हापकिनमध्ये संशोधक म्हणून त्यांनी लस उत्पादनासंबंधी काम चालू केलंसन १९७९ पासून सीरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले. भारतातील लस संशोधनात योगदान दिलं. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटले जाते. डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button