breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

सॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल

नवी दिल्ली – सॅमसंगने भारतात आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) पॉवर्ड फ्रंट लोड वॉशिंग मशिन्सची २०२० रेंजची घोषणा केली आहे. कंपनीने नवीन वॉशिंग मशीन्सची रेंजला ७ किलो वॉशर ड्रायर फ्रंट लोड मशीनसोबत आणले आहे. वॉशिंग मशीनची नवीन रेंज फिनिशिंग टाइम मॅनेज करण्यासाठी लाँन्ड्री प्लानर, ऑप्टिमल वॉश सायकल ऑफर करणारी ऑटो रेकमेंडेशन ऑप्शन आणि होमकेयर विजार्ड सुद्धा दिले आहे.

नवीन सॅमसंग वॉशिंग मशीन्सला अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सशिवाय सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करता येवू शकते. १० किलो फुली ऑटोमॅटिक फ्रंट लोड मॉडलची किंमत ६७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तर १० किलो वॉशर ड्रायर मॉडलची किंमत ९३ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ७ किलो वॉशर ड्रायरला व्हाइट आणि सिल्वर ऑप्शनमध्ये खरेदी करता येवू शकते. याची किंमत ४५ हजार ४९० रुपये आहे. यावर कंपनी ३ वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे. तसेच डिजिटल इन्वर्टर मोटरवर १० वर्षाची वॉरंटी देत आहे.

नवीन Q-Rator टेक्नोलॉजी
सॅमसंगकडून लाँच करण्यात आलेल्या १० किलो फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोड आणि १० किलो फ्रंट लोड वॉशर ड्रायर मॉडल्स मध्ये खास Q-Rator टेक्नोलॉजी युजर्संना मिळणार आहे. नवीन वॉशिंग मशीन रेंजमध्ये मिळणारी सॅमसंगची ही लेटेस्ट टेक्नोलॉजी आणि एआयचा फायदा उठवण्यासाठी युजर्सला कंपनी खास अॅप इन्स्टॉल करावा लागेल. युजर्स सॅमसंगच्या SmartThings अॅप डाउनलोड केल्यानंतर आपली वॉशिंग मशीनला स्मार्टफोनने कंट्रोल करू शकतील.

सॅमसंग अॅडवॉश सुद्धा
फीचर्समध्ये वॉशिंग मशीन्समध्ये सॅमसंगचे अॅडवॉश सुद्धा मिळते. याच्या मदतीने ग्राहकांना वॉश सायकलदरम्यान कधीही लाँन्ड्री आयटम मशीनमध्ये अॅड करता येवू शकते. तसचे सॅमसंगच्या एअरवॉश टेक्नोलॉजी कपड्यांना सॅनिटाइज आणि क्लिन करते. कंपनीच्या नवीन मशीनमध्ये ९७ टक्के कपडे सुखले जातात. तर सामान्य मशीन्समध्ये कपडे केवळ ६० ते ६५ टक्के पकडे सुखतात. खास हायजीन स्टीम टेक्नोलॉजीच्या मदतीने ९९ टक्के पर्यंत बॅक्टिरिया हटवते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button