breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत बेस्ट उपक्रमात आणखी 40 इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार

मुंबईत बेस्ट उपक्रमात आणखी ४० इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार असल्य़ाचे म्हटलं जात आहे. मुंबईत पर्यावरणपूरक बससेवेसाठी इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवली जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेंतर्गत देशभरातील विविध राज्यांत इलेक्ट्रिक बससाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे.

मुंबईत पर्यावरणपूरक बससेवेसाठी इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवली जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेंतर्गत देशभरातील विविध राज्यांत इलेक्ट्रिक बससाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे. त्याअंतर्गत बेस्ट उपक्रमात आणखी ४० इलेक्ट्रिक बस समाविष्ट होतील. यापूर्वीच ‘फेम’अंतर्गत सुमारे ३०० इलेक्ट्रिक बस बेस्टमध्ये दाखल होणार आहेत.

केंद्र सरकारच्या ‘फेम-२’ अंतर्गत महाराष्ट्रात बेस्ट, एसटी, नवी मुंबई परिवहन सेवा, गोवा, गुजरातमध्ये राजकोट, सुरत आणि चंदीगडमध्ये ६७० इलेक्ट्रिक बस पुरविण्याचे जाहीर केले आहे. त्यात बेस्टच्या वाट्याला ४० बस येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यापूर्वीच्या ३०० इलेक्ट्रिक बसमध्ये आणखी ४० बसची सेवा उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातंर्गत ‘फेम’ योजना आखलेली आहे. त्यानुसार राज्यांना इलेक्ट्रिक बससाठी सबसिडी दिली जाते. बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बस असून, त्यात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसची भर पडणार आहे. तर, सध्या बेस्टच्या स्वत:च्या सहा इलेक्ट्रिक बस असून ३२ बस या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

‘करोनाने बेस्टच्या आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम घडविला आहे. बेस्टची आर्थिक स्थिती यापूर्वीच मोडकळीस आली असताना मुंबई पालिकेने त्यांना आधार दिला होता. परंतु, करोनाने मुंबई पालिकेच्या आर्थिक गाड्यावरही दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिकेवर अवलंबून असलेल्य बेस्ट उपक्रमासही त्याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टला आणखी ४० इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार असल्याने आधार मिळेल’, असे मत बेस्ट समितीतील भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी मांडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button