breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 73 लाखांच्या पार

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 73 लाख जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 64 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 67 हजार 708 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तर 680 जणांचा कोरोनाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 73 लाख 7 हजार 98 एवढा झाला आहे. त्यापैकी सुमारे 1 लाख 11 हजार 266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 63 लाख 83 हजार 442 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुखरुप घरी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान कोरोनाने जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला असून, जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी 84 लाखांच्या पार गेला आहे. तर सुमारे 10 लाख 91 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 2 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button