breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सूर्यग्रहणानंतर लोकांना अंघोळ करावी लागते,पाईपलाईन दुरुस्तीचं काम पुढे ढकला-भाजपा नगरसेविकेची अजब मागणी

पुणे| महाईन्यूज |

सूर्यग्रहण झाल्यानंतर लोकांना अंघोळ करावी लागते त्यामुळे गुरुवारी होणारं पाईपलाईन दुरुस्तीचं काम पुढे ढकला अशी अजब मागणी पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर यांनी केली.

मागील काही दिवसांपासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद ठेवण्यात येतो. मात्र बुधवारी (२५ डिसेंबर) दर्श अमावस्या आहे तर गुरुवारी (२६ डिसेंबर) सूर्यग्रहण आहे. हिंदु धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी खर्डेकर यांनी केली.

दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरेश्या दाबाने आलं नाही तर लोकांना ग्रहणानंतर आंघोळ करता येणार नाही आणि त्यामुळे लोकांच्या विनंतीवरूनच आपण महापालिकेकडे ही मागणी केल्याच खर्डेकर यांनी म्हटलंय.यासंदर्भात मंजूश्री खर्डेकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धिरज घाटे यांना निवेदनही दिले आहे. त्यामुळे या मागणीबाबत पुणे महापालिका काय निर्णय घेणार हे पाहण महतत्वाच ठरणार आहे.

पुण्यात दिवसाआड पाणी सोडण्यात येत.त्यामुळे अनेक लोकांना अपु-या पाणी पुरवठ्याच्या अडचणींना तोंड द्याव लागतं .त्यासाठी लोक आणि विविध संघटनांनी आंदोलन करतात,महापालिकेवर मोर्चा होतो, तेव्हा कोणी नगरसेवक का नाही महापालिकेकडे पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न करत असा विचार नक्कीच उभा राहतो …

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button