breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामचुकार अधिका-यांवर तातडीने कारवाई करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचा-यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या.

त्यावर येत्या आठवडाभरात स्वच्छता विषयक कामांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्यामध्ये कामचुकारपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. आज दुपारी आयुक्त दालनात झालेल्या अधिका-यांच्या या बैठकीस महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सर्व शाखा प्रमुख, कार्यकारी अभियंता व प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, नदीच्या कडेने राडारोडा टाकणेत येतो. त्याची जबाबदारी कोणाची आहे. त्यामुळे संबधितांवर कारवाई करावी. मोकाट जनावरे, कुत्रे व डुकरे यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांस सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत कारवाई करावी. रस्ते व साफसफाई नियमित करण्यात यावी. काम न करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करावी. शाळा व ओपीडी यांना कलर कोड करावा. १४ वर्षा खालील विदयार्थ्यांमधून खेळाडू घडावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दयावे. त्यासाठी पोहण्याच्या तलावासह क्रीडासुविधा मोफत दयाव्यात.

आमदार लांडगे म्हणाले की, मराठी शाळांना करामध्ये सवलत दयावी, अंपग शाळांना कर माफी दयावी, सार्वजनिक शौचालयांची देखभाल व्यवस्थीत व्हावी. तसेच अनाधिकृत नळ कनेक्शन, शहरातील वाहतुकी बाबत डावी बाजू मोकळी करणे. प्रत्येक किलोमीटरवर रस्त्याच्या बाजूस मुतारी/ शौचालय उभारणे व त्याची देखभाल व्यवस्थीत करणे. शाळांचा दर्जा उंचावणे, अनधिकृत फलक अनाधिकृत बांधकाम, हॉकर्स झोन, भाजी मार्केट सुधारणा, महापालिकेचे दवाखाने व ओपीडी अदयावत करणे, आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावर येत्या आठवडाभरात सर्व अधिका-यांनी कार्यवाही करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बैठकीत सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button