breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘थर्टी फर्स्ट’ला पोलिस अचानक करणार नाकाबंदी, मद्यपान करणा-यांना सावधगिरीचा इशारा

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मद्यपान करणा-यांनो तुम्ही सावध रहा, कारण, ‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांकडून अचानक नाकाबंदी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मद्यपान करून तुम्ही फिरत असल्यास पोलिसांच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्यावर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येणार आहे.

दरवर्षी निगडीतील भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, मोशी टोलनाका, तळवडे आयटी पार्क चौक, नाशिकफाटा, पिंपरी चौक, देहूरोडमधील सेंट्रल चौक आदी ठिकाणी नाकाबंदी केली जाते. नेहमीच्या नाकाबंदीचे पॉइंट अनेकांना माहीत झालेले असतात. त्यामुळे मद्यपींसह गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही या मार्गाने न जाता इतर मार्गांचा वापर करतात.

यंदा पोलिसांकडून नेहमीच्या नाकाबंदीच्या ठिकाणांसह शहराच्या विविध भागांत अचानकपणे नाकाबंदी राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. आयुक्तालयाकडील ७० ब्रेथ ॲनालायझरने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. यासह हुल्लडबाजांना लगाम घालण्यासाठीही ठिकठिकाणी बंदोबस्तासह गस्त वाढविली जाणार आहे. पार्ट्यांवरही पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button