TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘आई कुठे काय करते’ मधील अभिनेत्याचं ओटीटीवर पदार्पण

‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील देशमुख कुटुंबावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. देशमुख कुटुंबातील मोठा मुलगा अभिषेकचं पात्र अभिनेता निंरजन कुलकर्णी साकारत आहे. निरंजनची नेटफ्लिक्सवरील लघुपटामध्ये वर्णी लागली आहे.

लघुपटाच्या माध्यमातून निरंजन ओटीटीवर पदार्पण करत आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. निरंजनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लघुपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. ‘सोल-कढी’ असं त्याच्या लघुपटाचं नाव आहे. या लघुपटात निरंजनने मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे.

“नेटफ्लिक्समध्ये माझं पहिलं पाऊल. अखेर सोल-कढी प्रदर्शित होत आहे. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सगळ्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आलं”, असं कॅप्शन देत निरंजनने पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/niranjan8889/?utm_source=ig_embed&ig_rid=60332ec4-d0ff-449e-bee3-71de219d1cb1

निरंजनचा हा लघुपट २ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सच्या युट्यूब चॅनेलवरुन प्रदर्शित करण्यात आला. या व्हिडीओला एका दिवसांत ५७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. समीशा सबनिस दिग्दर्शित या लघुपटात शोभा गोखलेही झळकल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button