breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज नाही असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्याच्या सहकाऱ्यांसह अनेकांकडून करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर फॅन्सने सुद्धा ही मागणी लावून धरली. एवढेच नव्हे, तर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहून महाराष्ट्र सरकारला सांगण्याची विनंती केली होती. याच दिवशी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशी होणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button