breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहूरोडमधील बुद्धविहारात सामुहिक बुद्धवंदना

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे 25 डिसेंबरला बुद्धविहाराची स्थापना केली होती. त्या ऐतिहासिक घटनेला 65 वर्षे होत असल्याने एक लाख आंबेडकर अनुयायी सामुहिन बुध्दवंदना करणार आहेत. असा निर्णय पिंपरी चौक येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील भीमसृष्टी येथे मंगळवारी (दि.10) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी ‘ह’ क्षेत्रीय समिती अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, बाळासाहेब ओव्हाळ, सागर आंघोळकर, संतोष कांबळे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, निकिता कदम, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहुरोड येथे  बुध्दरुपाची नव्याने प्रतिष्ठापना केली. येत्या 25 डिसेंबरला या ऐतिहासिक दिवसाला 65 वर्षे होत आहेत. त्या निमित्त .25 डिसेंबरला देहुरोड येथील बुध्दविहाराजवळ एक लाख आंबेडकर अनुयांयानी एकसाथ पांढरे कपडे परिधान करून सामुहिक बुध्दवंदना म्हणणार आहेत. आपल्या प्रभागातून आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार असल्याचे या वेळी नगरसेवकांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button