breaking-newsTOP Newsपुणे

पुण्यात आजपासून प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु

पुणे : राज्यात काल (16 जुलै) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. त्यानंतर आजपासून पुण्यात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आली आहे. बारावीचे निकाल लागताच आता विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विद्यालयात प्रवेश घेण्याची ओढ लागली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सर्व नामांकित विद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आजपासून ऑनलाईन सुरु झाली आहे.

विद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी जुलै महिन्यात अखेरपर्यंत अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून मुदत देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत अजून अस्पष्टता आहे. त्यामुळे बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा इतर क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशसाठी 50 ते 55 हजार जागा उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेसाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी तीस ते बत्तीस हजार जागा उपलब्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button