TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

सुनेला टोमणे मारणे हा छळ होत नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

येथील 30 वर्षीय महिलेनं सध्या दुबईमधील शालेय मित्राशी 2018 मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय़ घेतला होता. पण, लग्नाच्या काही दिवसांनी सदर महिलेला आपला पती हा घरकाम करणाऱ्यांचा मुलगा असून, आपल्या होऊ घातलेल्या सासू- सासऱ्यांनी त्याला दत्तक घेऊन मोठं केल्याचे समजले.

यावर न्यायालय म्हणाले की, आरोपकर्त्या महिलेनं केलेले हे आरोप पाहता या सहज होणाऱ्या गोष्टी आहेत, असंच त्याचं विश्लेषण करण्यात आलं. विशेष न्यायमूर्ती माधुरी बरालिया यांनी, ‘(सूनेला) सासू- सासऱ्यांनी उपहासात्मक बोलणं आणि टोमणे मारणं हा वैवाहिक जीवनाचाच एक भाग आहे. सर्वच कुटुंबांमध्ये हा प्रकार घडतो. त्यामुळं 80 आणि 75 वर्षांच्या या सासू – सासऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येऊ नये’, असा निर्णय़ सुनावला.

अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर सुनावणी करतेवेळी न्यायालयानं या दाम्पत्याला आपले पासपोर्ट पोलिसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर किंवा न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button