breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मुंबई – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘सारथी’ संस्थेलाला पुण्यात हक्काची जागा मिळणार आहे. तसेच, महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार असून नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार –

राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे नियम अ आणि ब गटातील सर्व राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी असतील.

वाचा :-मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची वेतन निश्चिती –

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त झालेल्या प्राचार्यांची वेतन निश्चिती करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करीत प्रोत्साहन वेतनवाढ

हाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करत त्यांना प्रोत्साहन वेतनवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक होत असल्याने वेतनातील तफावत दूर करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारण, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद-नागपूर खंडपीठ यांनी व उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘सारथी’ला पुण्यात शिवाजीनगर येथे जागा देण्यास मान्यता –

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेस पुण्यातील शिवाजीनगर येथील जागा उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शिवाजीनगर पुणे येथील (नगर भूमापन क्र.173 ब/1 मधील जागेपैकी) आगरकर रस्त्यावरील शालेय शिक्षण विभागाची 4 हजार 163 चौ.मी. इतकी जागा सारथीला देण्यात येणार आहे. या ठिकाणी सारथीचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल इ. सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. शासकीय जागा वाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तींच्या अधीन राहून महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किंमतीने ही जागा देण्यात देण्यात येणार आहे.

पुण्याजवळ चिखली येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विस्तार केंद्र –

पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास हवेली तालुक्यातील चिखली येथे विस्तार केंद्र स्थापन करण्यास 11.30 हेक्टर शासकीय जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. संस्थेच्या विस्तारित केंद्रामध्ये 8 उत्कृष्टता व विकासकेंद्र आणि संशोधन तसेच नाविन्यता पार्क सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या केंद्रांद्वारे प्रस्तावित सर्व अभ्यासक्रम हे कायम विना-अनुदानित व स्वयंअर्थसहायित तत्वावर संस्थेमार्फत चालविण्यास परवानगी देण्यात आली. या केंद्राच्या बांधकाम व साधनसामुग्रीकरिता लागणारा एकवेळचा निधी म्हणून 150 कोटी रुपये इतका निधी पुढील 3 ते 4 वर्षामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.

रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार –

रत्नागिरी येथे 300 प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून हे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु होईल. यात टप्प्याटप्प्याने एकूण 65 शिक्षक व 50 शिक्षकेतर कर्मचारी पदे भरण्यात येतील. यासाठी रुपये 153.42 कोटी इतक्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

गौण खनिजाच्या स्वामित्वधन –

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. हे वाढीव दर 1 जुलै 2021 पासून लागू होतील.

दहिकुटे, बोरी अंबेदरी प्रकल्प –

नाशिक जिल्ह्यातील दहिकुटे आणि बोरी अंबेदरी (ता.मालेगाव) या दोन पूर्ण झालेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या अस्तित्वातील कालव्यांचे रुपांतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. खडकाळ जमिनीत पाणी गळतीच्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button