breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी

नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली. यामुळे आता अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे’, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटले आहे. मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ज्ञ तसेच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायजर-बायोटेकची सुरक्षा, दर्जा आणि इतर गोष्टींची पडताळणी करण्यास सांगितले होते. यातून फायजर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचे समोर आले. तसेच कोरोनामुळे निर्माण होणारे धोके लसीमुळे दूर होत असल्याचेही सांगण्यात आले. त्यांनतर आता आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने अनेक देशांमधील नियामक प्रशासनाला कोरोना लसीच्या आयात आणि वितरणाला परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. सर्वात आधी ८ डिसेंबरला ब्रिटनने या लसीच्या वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button