breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुकलेल्या झाडांना घातले पाणी, मानवी हक्क संस्थेचा उपक्रम

– दोनहून अधिक झाडांना टॅंकरने केला पाणीपुरवठा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मानवी हक्क संरक्षण व जागृती समितीच्या वतीने पिंपळे गुरव, जुनी सांगवी आणि जिल्हा रुग्णालय परिसरातील पाण्याअभावी सुकलेल्या झाडांना टॅंकरने पाणी करुन त्यांना जीवदान दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्यस्थितीत “सुर्य आग ओकतोय” शहराचे तापमान 40 डिग्रीच्या पुढे चालले आहे. सिमेंटच्या बांधकामामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. पाण्याअभावी अनेक पशुपक्षी मरण पावत आहेत. अनेक झाडे जळत आहेत. “वृक्षवल्ली आम्हा, सगे सायरे”.हाच त्याचा समाज उपयोगी दृष्टिकोन समोर ठेवून झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
मानवी हक्क संस्थेने पर्यावरण संरक्षण करण्यासाठी शपथ घेतली. प्रत्येकाने एकतरी झाड लावून जगवण्याचे आव्हान शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी केले. या कार्यक्रमास अरुण पवार, उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,  मुळशी विभाग प्रमुख मीनाताई करंजवणे,यूवक अध्यक्ष आतिष गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय जगदाळे, ,पंडित वनसकर, राहूल शेंडगे, आप्पाजी चव्हाण अशोक जाधव, श्रीरंग शितोळे, सा, का, प्रदीप गायकवाड, विनायक बिराजदार, सचिन सांगावे, निलेश जगदाळे, विक्रम जगदाळे, बाळासाहेब शिंदे, सागर शेलार,सचिन नेमाडें आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button