breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओें अदर पूनावाला यांनी केले पंतप्रधान यांचे कौतुक
सीरम इन्स्टिटयूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य विभागाकडे भारतीयांना कोरोना लस खरेदी करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत का ? अशी विचारणा शनिवारी टि्वटरद्वारे केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी परत एक ट्वीट करून पूनावाला यांनी मोदींच्या संपूर्ण जगाला लस पुरवण्याच्या प्रयत्नाचे व त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. त्यामध्ये पूनावाला यांनी मोदींची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भाषणाची क्लिपदेखील शेअर केली आहे.