breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील स्वागत हॉटेलच्या वेटरकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

पिंपरी, (महाईन्यूज) – नाष्ट्याची ऑर्डर वेळेत न आल्याने विचारणा केली म्हणून हॉटेलमधील वेटरने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे घडली.

अशोक गोपाळराव पवार (वय 60, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आफ्रिदी शेख उर्फ अस्मान (रा. स्वागत हॉटेल, ट्रान्सपोर्टनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार शनिवारी सकाळी निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील स्वागत हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यांनी नाष्ट्याची ऑर्डरही दिली. ऑर्डर देऊनही बराच वेळ नाष्टा आणला जात नसल्यामुळे त्यांनी वेटरकडे विचारणा केली. त्यावर उस्मानने त्यांच्याकडे रागाने पाहून शिवीगाळ केली. दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने उस्मानने पवार यांना मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button