breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सीए करणार एसडीजी कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार – सीए जंबूसरिया

पिंपरी । प्रतिनिधी

जगाच्या कल्याणासाठी युनायटेड नेशनने घालून दिलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स(एसडीजी) या 17 कलमी कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराची सामाजिक जबाबदारी स्वीकारुन आयसीएआयने राष्ट्रीय स्तरावर समिती स्थापन केली आहे. नफा- तोट्याचे ताळेबंद तयार करण्याच्या कामाबरोबरच एक आता एसडीजीचा हा कार्यक्रम समाजात रुजवण्याची सीएंवर जबाबदारी आली आहे. यामुळे समाजात नक्कीच परिवर्तन घडून येईल. असा विश्वास दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाचे (आयसीएआय) उपाध्यक्ष सीए निहार जंबूसरिया यांनी व्यक्त केला.

दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने  परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी एशिया- ओशियानिक स्टँडर्ड ग्रूपचे अध्यक्ष सीए-डॉ. शिवाजी झावरे, आयसीएआयच्या वेस्टर्न इंडिया रीजनचे अध्यक्ष सीए ललित बजाज, उपाध्यक्ष सीए विशाल दोशी, सचिव सीए मुर्तुजा कांचवाला, आयसीएआयच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए श्रीनिवास जोशी, सीए राजेश शर्मा, विभागीय परिषदेचे सदस्य सीए यशवंत कासार, पिं-चिं. शाखाध्यक्ष सीए सिमरन लीलवानी आदी उपस्थित होते.

जंबूसरिया म्हणाले की, एसडीजी कार्यक्रमात गरिबी निर्मूलन, भूक निर्मूलन,चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता, नुतनीकरणाजोगी आणि स्वस्त ऊर्जा, चांगल्या नोकर्‍या आणि अर्थशास्त्र, नविन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे आणि समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, शाश्वत महासागर, जमिनीचा शाश्वत उपयोग, शांतता आणि न्याय, शाश्वत विकासासाठी भागीदारी यांचा समावेश आहे.

यावेळी कोरोना महामारीच्या काळात राबविलेल्या उपक्रम व नवीन योजनांची माहिती दिली.  सूत्रसंचालन व आभार सीए चंद्रकांत काळे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button