breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवी येथे गस्तीवरील पोलिसांवर दगडफेक; पोलीस नाईक जखमी

पिंपरी । प्रतिनिधी

अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांना हटकले असता त्यांनी गस्तीवरील पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास सांगवी येथे घडली. पोलिस नाईक अमोल लावंड असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी अमोल लावंड आणि कल्याण भोसले हद्दीत रात्रगस्त घालत होते. दरम्यान, औंध रुग्णालयानजीक त्यांना काही चोरटे अंधारात लपून बसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवून मोठ्याने आवाज दिला.

पोलिसांचा आवाज ऐकताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत पोलिस नाईक लावंड जखमी झाले. तसेच, पोलिसांची दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button