breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गृहनिर्माण प्रधान सचिवपदी म्हैसकर; तर MMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवास यांची नियुक्ती

मुंबई |

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागणी आहे. आर. ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागली आहे. या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोनिया सेठी यांना त्यांच्याकडे पदाभार सोपवण्यास सांगितलं आहे. एस. व्ही. आर श्रीनिवास हे १९९१च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. अखेर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची त्यांच्या जागी वर्णी लागली. तर मिलिंद म्हैसकर यांची वर्णी एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्या जागी लागली आहे. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद म्हैसकर हे १९९२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. महसूल आणि वन विभागतही प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button