breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये उडणार महापालिका निवडणुकांचा बार?

पुणे : गेली दीड वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या एका परिपत्रकामुळे हे संकेत मिळाले असून आता इच्छुकांना निवडणुकीच्या तयारीला लागावे लागणार आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवालांची तुरूंगात हत्या करण्याचा प्रयत्न? संजय राऊतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रामध्ये आजवर कधीही न झालेली राजकीय उलथापालथ एक वर्षापासून पहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असणारी शिवसेना फुटली, यानंतर शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे हे राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर आता राज्याच्या राजकारणात प्रभावी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शिवसेना भाजप युती सरकारमध्ये अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री विराजमान झाले आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटी नंतर राज्यातील सत्ताधारी पक्ष प्रबळ बनला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचा उल्लेख राजपत्रात करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button