breaking-newsक्रिडा

सिंधूने जिंकले या वर्षातील पाचवे रौप्यपदक

जकार्ता: भारताची  स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला आशियाई स्पर्धेतदेखील रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात तिला चायनीज तैपेईची खेळाडू ताई जी यिंग हिच्याकडून पराभूत २१-१३ २१- १६असे पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

पहिल्या सेटमध्ये प्रथम चायनीज तैपेईच्या खेळाडूने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर पिंधून पुनरागमन करत सेट ३-५ अश्या गुणसंख्येवर नेला. त्यानंतर मात्र विरोधी खेळाडूला रोखण्यात सिंधूला अपयश आले. १७- १० अशी मोठी आघाडी विरोधी खेळाडूने घेतली आणि सेटचा निकाल स्पष्ट करत पहिला सेट २१-१३ असा जिंकला.
दुसऱ्या  सेटमध्ये सिंधूने पराथम चांगली लढत दिले. एकावेळी दोन्ही खेळाडू  ४-४ असे बरोबरीच्या गुणसंख्येवर होते. त्यानंतर ताई जी यिंग ने आपली आघाडी ९-६ अशी केली. सिंधूच्या खेळातील कमतरता शोधत तिने आपली आघाडी १८-११ अशी केली. दुसरा सेट  २१-१६ असा जिंकत चायनीज तैपेईच्या खेळाडूने सुवर्ण जिंकले तर सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
यावर्षी सिंधूला एकही स्पर्धेचे विजेतेपद पटकविताअलेलले नाही. इंडिया ओपन, राष्ट्रकुल स्पर्धा, थायलंड ओपन, जागतीक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा या पाच स्पर्धेची तिने उपविजेतेपद पटकाविली आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button