breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची वायसीएम रुग्णालयात भेट; अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी |प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवगृह, मगर स्टेडिअम येथील जम्बो कोविड रुग्णालय व महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोविड 19 हॉस्पिटलला सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज दि. 13 रोजी सायंकाळी 3 वाजता अचानक भेट देऊन पाहणी केली. तसेच, रुग्णांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस करून रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या. 
वायसीएम रुग्णालयातील शवगृह 22 दिवसांपासून बंद असल्याबाबत तक्रारी येऊ लागल्या होत्या. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी श्री. ढाके यांनी थेट शवगृहांची पाहणी केली. तसेच, संबंधित डॉक्टराकडून तक्रारींबाबत माहिती जाणून घेत रजिस्टरमधील नोंदीची तपासणी केली. यावेळी, शवगृह बंद नसून चालू असल्याबाबतची खात्री करून घेतली. तसेच, वायसीएम रुग्णालयासाठी नव्याने परवानगी मिळालेल्या 20 केएल ऑक्सीजन टँक ची देखील पाहणी श्री. ढाके यांनी केली. 
त्याचबरोबर, राज्य शासनाच्या वतीने मगर स्टेडिअम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात शहरातील रुग्ण भरती न करणे, दाखल असलेल्या रुग्णांची अपडेट नातेवाईकांना न मिळणे अशा तक्रारी येऊ लागल्याने याठिकाणी देखील डॉक्टर व व्यवस्थापनासोबत चर्चा करून रुग्ण व नातेवाईकांशी समन्वय साधण्यासाठी योग्य नियोजन करावे. सद्धस्थितीत जम्बो रुग्णालयात 30 व्हेंटिलेटर, एचडीयु 22, ऑक्सीजन 407 बेड कार्यान्वित आहेत, तरी पुढील चार ते पाच दिवसात पूर्णपणे बेड उपलब्ध करून द्यावेत, या बाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 
तसेच, पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या ऑटो क्लस्टर येथील कोविड 19 हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी, वॉर रूममधून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी कशाप्रकारे संवाद साधला जातो, याची प्रत्येक्ष माहिती घेतली. तसेच, स्वतः वॉर रूम मधून रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्याचबरोबर ऑक्सीजन बेड वरील रुग्णांनी लवकरच बरे होऊन पुढील आयुष्य आपल्या कुटुंबासोबत निरोगी जगावे, अशी मोरया चरणी प्रार्थना करुन लवकरच बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button