breaking-newsपिंपरी / चिंचवड

#FightAgainstCOVID19 : कासारवाडी परिसरातील माजी नगरसेवक किरण मोटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

– गरजु नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे वाटप

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. उद्योग-व्यावसाय बंद असल्यामुळे मोलमजुरी करणारे, कष्टकरी कामगारांना रोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत कासारवाडी येथील माजी नगरसेवक किरण मोटे यांनी गरजु नागरिकांना मोफत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.

          कोरोना सारख्या महाभयंकर संकटात लॉकडाऊन झाल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. समाजातील सर्वस्तरातून गरजु नागरिकांना मदतीसाठी पुढाकार घेतला जात आहे. अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत व्हावी. या हेतुने आम्ही अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला, अशी माहिती माजी नगरसेवक किरण मोटे यांनी दिली.

          किरण मोटे म्हणाले की, कासारवाडी परिसरातील गोरगरिबांसाठी ही व्यवस्था सुरू केली आहे. यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. परिसरातील गरजु नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मोटे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button