breaking-newsमनोरंजन

सारा अली खानच्या चालकाला कोरोनाची लागण

मुंबई : बच्चन कुटुंबियांपाठोपाठ आता कोरोनाने बॉलिवूडमधील इतर कलाकारांच्या घरात शिरकाव केला आहे. अभिनेत्री सारा खानच्या चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सगळीकडेच थोडं भितीचं वातावरण आहे. बच्चन कुटुंबियांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने देशभरात थैमान मांडल आहे. आतापर्यंत ९ लाखापर्यंत कोरोनाचे रूग्ण देशात सापडले आहेत. 

सारा अली खानबद्दल बोलायचं झालं तर साराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिन्हे लिहिलं आहे की,’माझ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. तात्काळ आम्ही ही माहिती बीएमसीला दिली आहे. त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबियांची आणि इतर कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. माझी मदत केल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार.’

सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खान लवकरच वरूण धवनसोबत मोस्ट अवेटेड सिनेमा ‘कुली नं १’ सिनेमा दिसणार आहे. सगळ्यात अगोदर ओटीटी प्लॅटफॉर्म हा सिनेमा रिलीज आहे. मात्र त्यानंतर हा निर्णय बदलला असून मोठ्या पडद्यावर सिनेमा प्रदर्शित करणार आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button