breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराष्ट्रिय

Amarnath Yatra 2023 : यंदा १ जुलैपासून सुरू होणार श्री अमरनाथ यात्रा

१७ एप्रिलपासून ऑफलाईन आणि ऑनलाइन नोंदणीला सुरूवात

Amarnath Yatra 2023 : श्री अमरनाथ यात्रा २०२३ ची घोषमा करण्यात आली आहे. ही यात्रा १ जुलैपासून सुरू होणार आहे. तर ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आज (१७ एप्रिल) पासून सुरू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा म्हणाले की, प्रवास सुरळीत आणि सुलभ व्हावा यासठी सरकार सर्व प्रकारची व्यवस्था करत आहे. त्रासमुक्त तीर्थयात्रा व्हावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. राज्यात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना उत्तम आरोग्य सेवा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

तीर्थयात्रा सुरू होण्यापूर्वी दूरसंचार सेवा अधिक चांगल्या पद्धतीने चालवल्या जाणार आहेत. यंदा २०२३ मध्ये चालणारी ही ६२ दिवसांची यात्रा १ जुलैला सुरू होऊन ३१ ऑगस्टला संपेल. यात्रेला दोन्ही मार्गांनी एकाच वेळी सुरूवात केली जाईल. ज्यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरूवात होईल. सिन्हा यांनी यात्रेवेळी संपूर्ण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि येथील सर्व प्रकारच्या अस्वच्छतेची विल्हेवाट लावावी, अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button