breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

यंदा 15 ऑगस्टवरही कोरोनाचे सावट

देशातील कोरोनाचं वाढत प्रमाण पाहता पाहता ९ लाखांवर गेली आहे. अशातच पुढच्या महिन्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अर्थात १५ ऑगस्टवरही कोरोनाचे सावट आहे. जस इतर सण आणि कार्यमक्रमांना काही नियम अटी लागू करबन दिल्या आहेत तसचं यंदा स्वातंत्र्य दिन साजरा होण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर अतिशय वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना कोरोनामुळे कात्री बसण्याची शक्यता आहे. तसंच गेल्या वर्षाच्या तुलनेत या कार्यक्रमाला फक्त २० टक्केच व्हीव्हीआयपी किंवा इतर मान्यवर उपस्थित राहतील. फक्त या व्हीव्हीआयपींना प्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषण ऐकता येणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

संरक्षण सचिव अजय कुमार आणि पुरातत्व विभागाचे महासंचालक यांनी गेल्याच आठवड्यात लाल किल्ल्याला भेट दिली. १५ ऑगस्टसाठीच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. संरक्षण सचिव अजय कुमार सद्यस्थितीची माहिती घेतली. कुमार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून कार्यक्रमस्थळी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यंदाच्या स्वांतत्र्य दिनाचा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात यंदा शालेय विद्यार्थी आणि नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या कॅडेट्सचा सहभाग नसल्याचं म्हटलं जात आहे.

तसंत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ज्या ठिकाणी देशाला उद्देशून भाषण करतील तेथील मंचावर कुठल्याही व्हीव्हीआयपीला बसवलं जाणार नाही. यापूर्वी जवळपास ९०० व्हीव्हीआयपी पंतप्रधानांच्या भाषणावेळी दोन्ही बाजूला बसत होते. यावेळी त्यांना तिथे बसवण्यात येणार नाही. त्यांची व्यवस्था त्याहून खाली असलेल्या जागेवर करण्यात येणार आहे. तसंच फक्त शंभरावर व्हीव्हीआयपींना तिथे बसवलं जाणार आहे.

देशातच नव्हे तर जगावर कोरोनाचं संकट आहे. पण या कोरोनावर देशातील अनेक नागरिकांनी यशस्वीपणे मात केली आहे. यात कोरोनाविरोधी लढाई लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचाही समावेश आहे. यंदाच्या कार्यक्रमाला कोरोनामुक्त झालेल्या १५०० कोरोना योद्ध्यांना निमंत्रित केले जाणार आहे. यापैकी ५०० योद्धे हे पोलीस विभागातील असतील. उर्वरीत १००० जण हे विविध राज्यातील आणि विभागातील योद्धे असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button