breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CBSE चा दहावी बोर्डाचा निकाल 15 जुलै रोजी जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE चा दहावी बोर्डाचा निकाल उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे, यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयल स्वत:हा ट्विट करून माहिती दिली आहे. उद्या निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

याशिवाय, results.nic.in,cbse.nic.in या वेबसाईट वर सुद्धा रिझल्ट उपलब्ध असणार आहे. तसंच शक्य असल्यास विद्यार्थी शाळेत जाऊन ऑफलाईन रिझल्ट सुद्धा जाणून घेऊ शकणार असल्याचं त्यानी म्हटलं आहे. तसेच DigiLocker App, DigiResults App, Umang App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट त्यांची गुणपत्रिका (रिझल्ट) सुद्धा प्राप्त करता येईल यासाठी झोनल ऑफिस मध्ये जाण्याची गरज लागणार नाही.कोरोना व्हायरसच संकट लक्षात घेता यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे.

रमेश पोखरियाल यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून दहावी सीबीएसई च्या विद्यार्थी व पालकांना यासंदर्भात माहिती दिली. मात्र अद्याप त्यांनी वेळ सांगितलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in ही साईट तपासावी. निकाल तपासताना प्रवेशपत्र किंवा हॉल तिकिट जवळ ठेवा कारण रोल नंबर इत्यादी तपशिलांसाठी हे आवश्यक आहे.

दरम्यान, काल सीबीएसई तर्फे बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. सीबीएसई तर्फे सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला गेला होता. यानुसार यंदा 88.78%.निकाल लागला आहे. लवकरच महाराष्ट्र बोर्डाचे दहावी बारावी निकाल समोर येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button