breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे, पिंपरी, चिंचवड शहरात हवेची गुणवत्ता अधिक खालवली

मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर, ग्रीनपीस इंडियाच्या अहवालातून समोर आलं

मुंबई |महाईन्यूज|

मुंबईची गणना राज्यातील सर्वात प्रदूषित शहरात करण्यात आली आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी अहवाल सादर केला जातो. या अहवालात देशातील प्रदूषीत शहरांची यादी देण्यात आली आहे. या यादीत मुंबईत देशांतील प्रदूषित शहरांच्या यादीत २०१८ साली ३७ व्या क्रमांकावर होती. आताही तिचा समावेश प्रदूषित शहरांमध्येच केला गेला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत हवेचा दर्जा खालवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल परिसरात हा दर्जा अत्यंत वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. मुंबईबरोबरच डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी या उपनगरातही हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.

तर राज्यातील पुणे, पिंपरी, चिंचवड, जालना, लातूर, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा पाच ते आठपट अधिक खालवली आहे. मुंबईच्या हवा प्रदूषणात प्रामुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालातून समोर आलं आहे. मुंबईत वाहनांमुळे वाढतं प्रदूषण, बेसुमार लोकसंख्या, उद्योगधंदे व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button