breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमनोरंजन

बापरे! जगातील सर्वात महागडी व्हिस्की!; किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

नवी दिल्ली |

महागड्या दारूबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. जवळपास एक लाख ते दहा लाखांना दारू विकली गेली, अशा अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र एका व्हिस्कीची बाटली एक कोटी रुपयांना लिलावात विकली गेल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. व्हिस्कीची बाटली लिलावात १,३७,००० डॉलर्स म्हणजेच एक कोटीहून अधिक किंमतीला विकली गेली आहे. जवळपास ६ पट अधिक किंमतीने ही व्हिस्की विकली गेली आहे. ओल्ड इंगलेड्यूने ही व्हिस्की १८६० साली बाटली बंद केली होती. जवळपास २५० वर्षे जुनी व्हिस्कीची बाटली आहे. अजूनही या बाटलीतील व्हिस्की खराब झालेली नाही. ही व्हिस्की प्रसिद्ध फायनान्सर जे.पी.मॉर्गन यांची होती.

जेपी मॉर्गन यांनी १९००च्या दशकात जॉर्जियामधून बाटली विकत घेतली होती. त्यांनी ही बाटली आपल्या मुलाला दिली. त्यानंतर त्याने १९४२ आणि १९४४ दरम्यान दक्षिण कॅरोलिनाचे राज्यपाल जेम्स बायर्न्स यांना ही बाटली दिली. त्यानंतर १९५५ मध्ये पद सोडल्यानंतर दक्षिण कॅरोलिनाचे माजी राज्यपाल जेम्स बायर्न्स यांनी ही बाटली इंग्रज नौसेना अधिकारी फ्रान्सिस ड्रेक यांना दिली. तीन पिढ्या ही बाटली फिरत आहे. मॉर्गन यांच्या तळघरात ही बाटली होती. तीन पैकी एकच बाटली आता उरली आहे. या बाटलीवर एक लेबल आहे. त्यावर “Bourbon कदाचित १८६५ मध्ये तयार केली आहे. ही जेपी मॉर्गन यांच्या तळघरात होती. मॉर्गन यांच्या मृत्यूनंतर संपत्तीतून ही मिळाली आहे.” असं लिहिलं आहे. व्हिस्की दोन शतकं जुनी असल्याने पिण्या योग्य नाही. व्हिस्की बाटलीत बंद केल्यानंतर जवळपास १० वर्षांपर्यंत चालते. त्यामुळे आता रिसर्चनंतर कळेल ही दारू पिण्यायोग्य आहे की, नाही ते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button