breaking-newsपिंपरी / चिंचवड

सवलत योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या ; भाजप नगरसेवक बाबू नायर यांची मागणी

पिंपरी –  महापालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षात मिळकतधारकांना विविध सवलती दिल्या आहेत. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ही सवलत योजना 20 एप्रिलपासून सुरु करण्यात आली. परंतु, प्रशासनाने यामध्ये हलगर्जीपणा केला आहे. मिळकतधारकांना बीलांचे वाटप उशिरा झाला आहे. त्यामुळे या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस व नगरसेवक बाबू नायर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात नायर यांनी म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने सवलत योजना सुरु करण्याअगोदरच बीलांची छपाई करुन मिळकतधारांकाना देणे आवश्यक होते. त्याचे नियोजन करण्याची गरज होती. परंतु, तसे झाले नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगामुळे मिळकत धारक सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.  ही योजना 30 जूनपर्यंतच आहे. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरु होतात. त्यामुळे करदात्यांना विद्यार्थ्यांचे अॅडमीशन घ्यावे लागते. त्यासाठी पैशांची कमतरता असते. त्यामुळे मुदतवाढ दिल्यास त्यांना दिलासा मिळेल आणि कर सवलतीचा लाभ होईल.

आता कुठे नागरिकांना बीले मिळाली आहेत. सवलत योजना संपायला केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत.  यामुळे मिळकत धारक सवलतींपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. पालिकेलच्या तिजोरीत देखील पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे कर सवलत योजनेला एक महिना म्हणजे 31 जुलै 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नायर यांनी निवेदनातून केली आहे.  तसेच मुदवाढ दिल्यास करदात्यांना दिलासा मिळेल. ते एकरकमी कराचाभरणा करतील. परिणामी, पालिकेच्या तिजोरीत देखील पैसे जमा होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button