breaking-newsमहाराष्ट्र

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या खासदार राजेंद्र गावितांना धक्काबुक्की

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जॉगर्स पार्क येथे वॉकसाठी गेलेल्या गावित यांनी पार्कमधील सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घालणाऱ्या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर संतापलेल्या टोळक्याने गावितांसह पार्कमधील सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली.

मीरा रोड येथे राहणारे राजेंद्र गावित हे पालघरचे खासदार आहेत. मंगळवारी सकाळी राजेंद्र गावित नेहमीप्रमाणे घराजवळील जॉगर्स पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. पार्कमधील लॉनवर बुट घालून फिरण्यास मनाई आहे. मात्र, आठ जण या लॉनवर बुट घालून फिरत होते. पार्कमधील सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले असता वाद सुरु झाला.

वॉकसाठी गेलेले राजेंद्र गावित यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी देखील सुरक्षा रक्षकाचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले. गावित यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता गावित यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. अखेर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button