breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना सुनावलेल्या शिक्षेचा वकील संघटनांकडून निषेध

पुणे |महाईन्यूज|

सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात काळ्या फिती बांधून शांततापूर्ण निषेध सभेचे आयोजन सोमवारी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर करण्यात आले होते. यामध्ये लोकायतची वकील विंग समतेसाठी वकील तसेच पुणे जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या.

यामध्ये पुणे जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या. यामध्ये अ‍ॅड. मोहन वाडेकर, अ‍ॅड. शाहीद अख्तर, अ‍ॅड. नाथा शिंगाडे, अ‍ॅड. गायत्री कांबळे, अ‍ॅड. प्रभाकर सोनवणे, अ‍ॅड. वाजीद खान, अ‍ॅड. आरिफ खान, अ‍ॅड. सुषमा नामदास, अ‍ॅड. अतुल गुंड-पाटील, अ‍ॅड. सैफान शेख आणि इतर वकील सामील झाले होते.

अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले. याचे कारण काय तर त्यांनी केलेले दोन ट्वीटस! ज्येष्ठ विधिज्ञांनी या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत म्हटले आहे की भूषण यांची विधाने अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाचा अवमान होत नाही.
पुणे जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय, विरोध दर्शवतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ती घेत आहोत असे प्रतिपादन सामील झालेल्या वकिलांनी व्यक्त केले..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button