breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Media Association of India : पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचार्‍यांसाठी ‘माई’ ठरणार आधार!

नवीन पदांवर होणार नियुक्त्या; राज्यातील पत्रकारांना जोडण्यासाठी पुढाकार

मुंबई : माध्यमांचा आवाज असलेल्या मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या पदांचा विस्तारू करून संघटनेची ताकद वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार महसूल विभागवार संघटन सचिव या पदासोबत संघटन सहसचिव पदाची जबाबदारी देखील दिली जाणार असल्याचे संघटनेने जाहिर केले आहे. तसेच राज्यातील सर्वच पत्रकारांना जोडून संघटनेचा विस्तार वाढविण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार संघटनेने केला असल्याची माहिती मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) प्रसिद्धी समन्वयक शेखर धोंगडे यांनी दिली आहे.

पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी, सर्व माध्यमक्षेत्राच्या सर्व विभागातील श्रमिकांना, तसेच मालक, प्रकाशक आणि वितरक यांना एकाच छत्राखाली आणून त्यांचा सन्मान, हित आणि सन्मानार्थ काम करणारी माई ही राष्ट्रीय संघटना आहे. या मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे पहिले अधिवेशन कलागुणाची खाण असणार्‍या करवीर नगरीत अर्थात कोल्हापुरात दिवाळी दरम्यानला करण्याचा मानस सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत यांनी व्यक्त केला आहे.

मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) प्रसिद्धी समन्वयक शेखर धोंगडे यांनी दिलेल्या माहितीनूसार, संघटनेसाठी काम करणारे, वेळ देणारे पदाधिकारी संघटनेमध्ये नेमण्यात येणार आहेत. डॉ. कादिर यांनी या बाबत सूचना मांडल्याप्रमाणे एनयुजे महाराष्ट्रचे माजी संघटन सचिव कैलास उदमले हे कायमचे निमंत्रित सदस्य असणार आहेत. संघटन सचिव व अध्यक्ष यांच्याशी सहकार्य समन्वय करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. नवीन पदांसाठीची जबाबदारी देताना कोणत्याही पक्षाचे सदस्य नसलेल्यांनाच जबाबदारी मिळणार असल्याचे धोंगडे यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘..तर अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील’; संजय राऊत यांचं विधान 

..असा होणार पदांचा विस्तार!

महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो. हा विश्वास मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकक्षेच्या व्यापकतेतून दिसून येतो आहे. त्यामुळेच ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या संस्थापक व निमंत्रिताच्या बैठकीत सर्वप्रथम महसूल विभाग संघटन सचिव त्या जोडीला सहसंघटन सचिव, नंतर जिल्हावार संघटन सचिव, महसूल विभाग प्रवक्ते यांची घोषणा होणार आहेत. तसेच महिला माध्यमकर्मींना गुणवत्तेनुसार समप्रमाणात जबाबदारी देण्यात येणार आहे. जेणेकरून करुन महिलांसाठीच्या प्रश्नाना न्याय देण्याचा संघटनेचा मानस आहे. जिल्ह्यांची कार्यकारणी निवडल्यानंतर, राज्याची महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. देशपातळीवरील पदाधिकारी व राष्ट्रीय कार्यकारिणी हे अधिवेशनात घोषित केले जाणार आहेत.

ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांचा लढा..

सध्या राजकीय समर्थकांच्या संघटना वाढल्या आहेत. त्यामुळेच माध्यमकर्मीचे हित दुर्लक्षित होते आहे. तसेच साप्ताहिके, लघु, मध्यम दैनिके, वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल, पत्रकारांच्या युट्युब वाहिन्या यांच्या हितासाठी काम करणारे संघटनेला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. सच्चा पत्रकारांच्या, प्रसारमाध्यमाच्या हितासाठी पारदर्शकपणे काम करणारी माई संघटना आहे. जिल्ह्यातून ज्या संघटना सोबत येतील त्यांना असोसिएशन म्हणून जोडून घेण्याचे काम केले जाणार आहे. तसेच संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्धारही सर्वानुमते करण्यात आला असल्याची माहिती मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) प्रसिद्धी समन्वयक शेखर धोंगडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button