TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कडक कारवाईसाठी डॉक्टरांचा मूक मोर्चा

मनमाड : रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिला रुग्णाचा अहवाल देण्यास नकार दिल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रात्रीच्या वेळी रुग्णालयात शिरून डॉक्टरांना बेदम मारहाण, शिवीगाळ केली. शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी मूक मोर्चा काढून शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

या घटनेबाबत डॉ. जितेंद्र गांधी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रविवारी रात्री सव्वादहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही घटना घडली. डॉ. गांधी हे नवजात शिशूू व बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे येथे गांधी रुग्णालय आहे. अनुष्का गरुड यांना ताप आल्याने उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारपासून या रुग्णाचे अहवाल मिळावेत म्हणून डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकात वाद सुरू होता. डॉ. गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री १०.१५ च्या सुमारास सर्वेश गरुड अनुप गरुड, पप्पू गरुड आणि इतर चार ते पाच जणांनी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी अहवाल आम्हाला द्या, अशी मागणी केली. रुग्णालयातून सोडताना अहवाल दिला जाईल, असे परिचारिकांनी सांगितले. रात्री डॉक्टर आल्यावर याबाबत चर्चा करा, असे सांगितले. यातून वाद वाढून रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. गांधी रात्री रुग्णालयात येताच त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. असे तक्रारीत म्हटले आहे. रुग्णालयातील साहित्याची मोडतोड करण्यात आली. घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या घटनेचे पडसाद शहरात उमटले. मनमाड मेडिकल असोसिएशनच्या आणि आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रभारी पोलीस अधिकारी प्रल्हाद गीते यांना निवेदन दिले. या घटनेचा निषेध करून याची निष्पक्ष चौकशी करावी, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन डॉक्टरांच्या संघटनेने दिले. या वेळी आयएमएचे अध्यक्ष अजय भन्साळी, शांताराम  कातकडे, संदीप कुलकर्णी, सुनील बागरेचा, प्रताप गुजराथी, रवींद्र राजपूत, प्रताप पाटील, नूतन पहाडे आदी डॉक्टर उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button