breaking-newsमनोरंजन

सर्जिकल स्ट्राईकवरच्या सिनेमात काम करायचेय – मनोज वाजपेयी

बॉलिवूडमध्ये नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयीला “सर्जिकल स्ट्राईक’वर सिनेमा बनवण्याची ईच्छा आहे. सर्जिकल स्ट्राईकवरचा व्हिडीओ आपण बघितलेला नाही. मात्र तरिही जर “सर्जिकल स्ट्राईक’वर कोणी सिनेमा बनवला तर आपल्याला त्यामध्ये काम करायला आवडेल, असे मनोज वाजपेयीने सांगितले. आपले लक्ष वेधून घेतील, अशा फारच कमी स्क्रीप्ट असतात.

बऱ्याचशा सत्य घटनांवर सिनेमांसाठी कथा लिहील्या जातात. मात्र त्यापैकी फारच कमी कथांमध्ये दम असतो. “सर्जिकल स्ट्राईक’वर जर कथा लिहीली गेली तर ती निश्‍चितच दमदार असेल. अशा सिनेमामध्ये आपल्या नक्की काम करायला आवडेल, असेही त्याने सांगितले. मनोजने जॉन अब्राहमच्या जोडीने “सत्यमेव जयते’मध्ये काम केले आहे. मनोजने जॉनच्या साथीने यापूर्वीही काम केले आहे.

यश आणि अपयश या दोन्हींमध्ये काहीही अंतर नसलेला कलाकार म्हणजे जॉन आहे, दर शुक्रवारी रिलीज होणाऱ्या सिनेमाच्या यशापयशावर कलाकारांचे ऍटिट्युड बदलत जातात. पण जॉनचा ऍटिट्युड कधीही बदलत नाही. तो सातत्याने शांत राहून सिनेमाच्या यशाबद्दल विचार करत असतो, असे मनोज म्हणतो. जॉन आणि मनोजचा “सत्यमेव जयते’ 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button