breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणमधील आत्मघाती हल्ल्यात 19 मृत्युमुखी, 20 जखमी

मृतांमध्ये हिंदू आणि शीखांचाही समावेश 
जलालाबाद – अफगाणिस्तानमध्ये आज झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 19 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 12 हिंदू आणि शीख आहेत. या हल्ल्यात इतर 20 जण जखमी झाले.

अफगाणच्या जलालाबाद शहरातील बाजारात आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवला. या स्फोटामुळे जलालाबाद हादरले. आत्मघाती हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य हिंदू आणि शीख रहिवासी होते का ते तातडीने समजू शकले नाही. विशेष म्हणजे. अफगाणचे अध्यक्ष अश्रफ घनी जलालाबादच्या भेटीवर असतानाच हा हल्ला झाला.

अफगाण सरकारने तालिबान या दहशतवादी संघटनेबरोबर 18 दिवसांची शस्त्रसंधी जाहीर केली होती. त्या शस्त्रसंधीची मुदत संपल्यानंतर शनिवारीच घनी यांनी सुरक्षा दलांना तालिबानविरोधी मोहीम पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला होता. अशातच जलालाबादमधील हल्ला घडला.

या हल्ल्याची जबाबदारी तातडीने कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. अफगाणमध्ये इसिस या खतरनाक दहशतवादी संघटनेचेही अस्तित्व आहे. मात्र, त्या संघटनेला शस्त्रसंधीतून वगळण्यात आले होते. दरम्यान, आत्मघाती हल्ल्यात जखमी झालेल्या काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button