breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात सरकारी किंवा खासगी कार्यालयांमध्ये विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय

दुकाने, हॉटेल, मॉल, तसेच खासगी कार्यालये ‘अनलॉक’नंतर उघडण्यास परवानगी देताना जाहीर करण्यात आलेल्या नियमावलींना नागरिक तसेच व्यावसायिकांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, या पथकाकडून काल, बुधवारपासून शहरभर कारवाई करण्यात येणार आहे. सरकारी, तसेच खासगी कार्यालयांमध्ये मास्क न वापरता फिरणारे कर्मचारी, नागरिक यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत.

राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’चा नारा देऊन टप्प्याटप्पाने राज्य ‘अनलॉक’ करण्याचा निर्णय घेतला. हे अनलॉक करताना राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती. महापालिका आयुक्तांनीही शहरात स्वतंत्ररित्या नियमावली जाहीर करून दुकाने, मॉल, हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझरची सुविधा, तसेच सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन करण्याचे बंधन घातले आहे. शहरातील गर्दी वाढत असताना या नियमांकडे डोळेझाक होत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच सरकारी किंवा खासगी कार्यालयांमध्येही विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर १००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुमार यांनी दिले आहेत.

शहरातील करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, शहरातील रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी खाटांची कमतरता सातत्याने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी नागरिकांची बेफिकीरी दिसत असून, पोलिसांकडूनही मास्कची कारवाई जोरदार सुरू आहे. यापुढील काळात शहरातील सरकारी तथा खासगी कार्यालयांमध्येही नागरिक मास्क वापरतात की नाही, याची तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. संशयितांच्या चाचण्या वाढविणे, बाधितांवर उपचार करणे आणि संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमांचे पालन करावयास लावणे, या त्रिसूत्रीवर महापालिका प्रशासनाने जोर दिला असून, यापुढील काळात दंडात्मक कारवाई वाढण्याची शक्यता आहे.

”सरकारने अनलॉकचा निर्णय घेताना करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. दुकानांमध्ये, तसेच मॉलमध्ये सुरक्षित अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझर न वापरणे यासारख्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर कारवाई करण्यास अतिक्रमण आणि घनकचरा निमर्लून विभागाच्या कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button