breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यात 18 सप्टेंबर सकाळी 9 ते 19 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडीत

ठाणे शहरातील रहिवाशांना पाणी कपातीला समोरे जावे लागणार आहे. मेट्रोचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आणि इतर भागातील डागडुजीच्या कामं हाती घेतल्याने येत्या शुक्रवारी म्हणजे 18 सप्टेंबरला पाणी कपात केली जाणार असल्याचे नागरी समितीने सांगितले. नागरी समिती आणि शहाद टेमघर जल संसाधन कंपनी यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारपासून खंडीत करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने सांगितले आहे. शहरातील अनेक भागांत शुक्रवारी 18 सप्टेंबर सकाळी 9 ते शनिवारी 19 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा खंडीत केल्यामुळे माजिवाडा जंक्शनजवळील लाईन 4 मेट्रोचे काम करणे शक्य होणार आहे.

घोडबंदर रोडला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन माजिवाडा मेट्रो स्टेशन दरम्यान येत असल्याने STEM कडून मुख्य पाईपलाईन शिफ्ट करण्याचे काम आधी करावे लागणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले आहे. MIDC कडून पाणीपुरवठा होणारे भाग सोडून शहरातील इतर भागात शुक्रवार सकाळ ते शनिवार सकाळपर्यंत पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. यात घोडंबदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, गांधी नगर, इटरनेटी मॉल जवळील परिसर, जॉनसन अँड जॉनसन, समता नगर, इंदिरा नगर, लोकमान्य नगर, श्रीनगर, ठाणे जेल, साकेत, उथळसर, मुंब्रा रेतिबंदर आणि कळव्या जवळील भागांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यासाठी एक दिवस पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले. या दरम्यान साकेत ब्रिजजवळील मुख्य वॉल्व आणि बाळकुम जवळील वॉल्व दुरुस्त करण्यात येणार आहे. तसंच घोडबंदर रोडवरील इलेक्ट्रीक पॅनल देखील बदलण्यात येणार असल्याची माहिती टीएमसीच्या इंजिनियर्सकडून देण्यात आली आहे.

दरम्यान पाणी कपात होणार असल्यामुळे पाणी भरुन ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तसंच काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button