breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

मुंबई – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. देशात, राज्यात राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे.“काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण केले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा”, असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button